पौड : ग्रामपंचायत दारवली ( ता.मुळशी ) येथील उपसरपंचपदी गणेश धनवे यांची दुसऱ्यादा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच मंगेश बलकवडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी गणेश धनवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच नरेश बलकवडे,माजी उपसरपंच मंगेश बलकवडे, ग्रामपंचायत सदस्य धनजंय भिलारे, सुलोचना केळकर, कल्पना ठोंबरे,निता बलकवडे, ग्रामसेवक हनुमंत भंडलकर तसेच दारवली - धनवेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश धनवे यांनी यापूर्वीही उपसरपंच म्हणून कारभार पाहिला आहे. गावातील जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बारगळलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर गणेश धनवे यांनी सांगितले.