पौड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पौड ग्रामपंचायतीच्या वतीने पौड गावातील १० वी आणि १२ वीतील १२ विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच जगदिश लांडगे व इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
पौड गावातील १० वीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या ३ तर १२ वीला उत्तीर्ण झालेल्या ९ अशा मिळून १२ विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. छञपती शिवाजी विद्यालय पौडचा मुख्यध्यापक म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेला संतोष भोकरे यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच तसेच पौड गावात महावितरणचे काम करणारे राम शिंदे यांना ग्रामपंचायतीच्या वतीने खांबावर काम करण्यासाठी बावीस फुटी शीडी भेट देण्यात आला.
यावेळी सरपंच जगदीश लांडगे, उपसरपंच रसिका जोशी, ग्रामविकास अधिकारी विजय कदम,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, अजय कडू,प्रशांत वाल्हेकर, प्रकाश शिंदे, प्रिती आगनेन, नंदाताई नवले, वंदना भोयणे व आशा जाधव यांच्याही हस्ते सत्कार करण्यात आले. या वेळी विद्यार्थी,पालक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.