logo
add image
add image
Blog single photo

कोरोना काळात सेवा करणाऱ्याचा गौरव करणे ही अभिमानाची गोष्ट : संपर्कप्रमुख सत्यवान उभे


पिरंगूट : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या शिवसैनिक आणि पदाधिकारी यांना सुचना दिल्या होत्या त्या सुचनेनुसार शिवसैनिक तंतोतंत पालन करत आहेत. कोरोना काळात जनतेची सेवा केलेल्यांचा गौरव करणार्या ज्योती चांदेरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांनी सूस ( ता.मुळशी ) येथे केले.    

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुस, ( ता.मुळशी ) येथे कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा पार पडला. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता काम केलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, पत्रकार, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार अशा विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटिका ज्योती नितिन चांदेरे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

        यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, जिल्हा संपर्क महिला आघाडी संघटिका शालिनी देशपांडे, जिल्हा महिला संघटिका संगीता पवळे, शिव सहकार सेना-पुणे जिल्हा बाळासाहेब भांडे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, उपशहर प्रमुख गजानन थरकुडे, दिलीप मुरकुटे, भोर विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष सुनिल चांदेरे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे, मुळशी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सुहास भोते, मुळशी तालुका शिवसहकार सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, भारतीय कामगार सेनेचे गोवर्धन बांदल, सुस उपसरपंच गावचे उपसरपंच अपूर्वा निकाळजे, प्रीतम बांदल, संतोषी मारणे, सुषमा धामणे, युवासेना तालुकाप्रमुख संतोष तोंडे, मुळशी तालुका संघटक गोविंद सरुसे तसेच विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

        कोरोना काळात प्रत्येक घरातील महिला आपले घर स्वच्छ ठेवून आपल्या परिवाराचे संरक्षण करणारी एक महिला रणरागिनीच आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण ठेवून ८०% समाजसेवा व २०% राजकारण या उद्देशाने उपस्थित सर्व महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार नाव नोंदणी अभियान, पॅनकार्ड, आधारकार्ड, आँनलाईन सात बारा चुकदुरूस्ती, वारस नोंद, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, बोनाफाईट दाखल असे सर्व शासकीय ऑनलाईन दाखले देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून ज्योती चांदेरे यांना पुढील राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन नितिन चांदेरे यांनी केले तर प्रास्ताविक ज्योती चांदेरे यांनी व  गोवर्धन बांदल यांनी आभार मानले

           हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला अनुसरून राजकारणात काम करत आहे. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता ज्या नागरिकांनी समाजासाठी समाजसेवेचे काम केलं आहे आशा नागरिकांना सन्मानित करताना मोठा आनंद मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या सुचनांचे पालन करून गावातील कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेना महिला आघाडी मुळशी तालुका संघटिका ज्योती चांदेरे यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top