logo
add image
add image
Blog single photo

भुकुम येथे रेखा योगेश वाघ सरपंच तर सचिन पोपटराव आंग्रे उपसरपंचपदी बिनविरोध


भुकुम येथे रेखा योगेश वाघ सरपंच तर सचिन पोपटराव आंग्रे उपसरपंचपदी बिनविरोध.

मुळशी: भुकूम  येथे रेखा योगेश वाघ सरपंच तर सचिन पोपटराव आंग्रे उपसरपंचपदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उज्ज्वला पवार ,भागवत यादव ,शरद बेलदार यांनी काम पाहिले. सरपंच उपसरपंच पदासाठी वाघ आणि आंग्रे यांचे दोनच अर्ज आल्यामुळे वेळेचा नियम पाळून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठीक दोन वाजता निकाल जाहीर केला. 

अंकुश प्रकाश खाटपे,सुवर्णा सुभाष पानसरे,गौरी प्रसाद भरतवंश, सचिन बाळासाहेब हगवणे, निलेश जयसिंगराव ननवरे, सुवर्णा रामदास आंग्रे,मयुरी अभिलाष आमले या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. यावेळी पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस हवालदार नितीन गार्डी आणि गणेश साळुंके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

add image
add image

Leave Comments

Top