पौड : काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातील काही भागात तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसून अनेक गावातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यावेळी संधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार,जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे वेळोवेळी केलेली मागणी व पाठपुराव्यामुळे आज मुळशी तालुक्यातील खारावडे, कोळवण, माले व आंबवणे या भागातील नागरिकांपर्यंत मदत पोहचवित असता खूप समाधान वाटत असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केले.
आमदार संग्राम थोपटे यांचे विशेष प्रयत्नांतून मुळशी तालुक्यातील खारावडे, कोळवण, माले, आंबवणे या भागातील तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या मुळशीतील लाभार्थ्यांना ३ तीन कोटी ७५ लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते.
याप्रसंगी मावळ - मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण,पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ,मुळशी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, बाजार समितीचे संचालक दादाराम माडेकर, शिवाजी बुचडे, संदीप केदारी, युवक अध्यक्ष सुहास भोते,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निकाळजे, संजय उभे,शिवाजी जांभूळकर, युवा नेते मधुर दाभाडे,आंबवणेचे सरपंच मच्छिंद्र कराळे,जेष्ठ नेते नंदूशेठ वाळंज,पोपट दुडे, किसन जोरी, गोपाळ कदम,शिवाजी तांगडे,राहुल शेडगे,राहुल जांभुळकर,मोहन झुंजुरके,महेश गुरव,सुरेश पारखी,लक्ष्मण आप्पा ठोंबरे,शरद शेंडे, सरपंच शिल्पा पोकळे, सुहास शेंडे, उज्वल ववले, गणेश पवळे, दिनेश कंधारे,स्वप्नील टेमघरे, कान्हू बोंन्दे, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री तावडे,महावितरणचे अभियंता फुलचंद फड यांच्यासह कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.