logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुका प्राथमिक शिक्षण सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून धोंडिबा कुंभार यांची निवड


पिरंगूट : मुळशी तालुका स्तरीय प्राथमिक शिक्षण सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून धोंडिबा कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत एक तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी तसेच तालुक्यातील अन्य चार अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. धोंडिबा कुंभार यांचे लवळे हे गाव असून त्यांचे शिक्षण एम.ए.बी.एड पर्यंत झालेले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेत त्यांनी चाळीस वर्षे शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. मामासाहेब मोहोळ मुठा या विद्यालयात त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलेले होते. मुठा विद्यालयात कार्यरत असताना त्यांनी शासनाच्या पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणविषयक विविध उपक्रम राबविलेले होते.                                                                                    जपानमधील जागतिक स्तरावरील पर्यावरण शिक्षण कार्यशाळेत  सादरिकरण

 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुठा (ता.मुळशी) येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयात असताना सन २०१३ मध्ये त्यांची जपान येथे झालेल्या  'शाश्वत विकासासाठी शिक्षण' या पर्यावरणविषयक कार्यशाळेसाठी निवड झाली होती.  या कार्यशाळेसाठी भारतातून  जपानला जाणारे श्री. कुंभार हे एकमेव शिक्षक प्रतिनिधी होते. 

                    शाश्वत विकासासाठी शिक्षणा अंतर्गत 'औपचारिक व अनौपचारिक शिक्षणात शिक्षक, शाळा आणि समाज यांची भागीदारी' या विषयावर श्री. कुंभार यांनी भारतातील प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर सादरीकरण केले होते. जपानमधील ओकायामा शहरात ही कार्यशाळा आयोजित केली होती. 

 शिक्षक म्हणून कामगिरी – 

१९९६ साली त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.                                             सन १९९६ साली संत साहित्याचे अभ्यासक व विचारवंत  बाळासाहेब भारदे यांच्या  हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते. तालुक्यातील पंचवीसहून अधिक विविध संस्थांकडून त्यांचा  गौरव झालेला आहे. मुळशीरत्न , आम्ही मुळशीकर , राजर्षी शाहू महाराज तसेच अन्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेले आहे.  पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पौड पोलिसांनी कुंभार यांचा गौरव केलेला आहे.  राज्य शासनाच्या पर्यावऱण विभागाचा राज्यस्तरीय सृष्टीमित्र पुरस्कार त्यांना मिळाला आहे.  संगीत क्षेत्रातही चांगली कामगिरी. सकाळ नाट्यसंगीत , भजनस्पर्धा , समूहगीत स्पर्धा आदींमध्ये शाळांना , विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळवून देण्यात मोठी कामगिरी.  सकाळ वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम स्वीकारून सामाजिक जाणिवांच्या बातम्यांना प्राधान्य देण्यावर त्यांचा भर असतो.  पत्रकार संघ , मुळशीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. 

add image
add image

Leave Comments

Top