माले : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार राज्यात होत असलेल्या शिवसंपर्क मोहीम व सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असुन नव्या व जुन्या सैनिकांच्या संवादामुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे आणि याचा फायदा आगामी सर्वच निवडणुकांमधे पक्षाला होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी माले येथे केले.
पक्षाच्या वतीने ५०,००० हजार सदस्य नोंदणी करण्यात आली असुन भोर,वेल्हा, मुळशी,पुरंदर व हवेली या तालुक्यातील पंचायत समितीच्या गणांमधे ३० बैठका घेण्यात आल्याचे चांदेरे यांनी सांगितले.
मुळशी धरण विभागातील पौड-अंबवणे गणातील शिवसैनिकांची बैठक माले येथे झाली यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, तालुकाप्रमुख सचिन खैरे,युवासेना तालुकाअधिकारी संतोष तोंडे,गणपत वाशिवले, गोविंद सरूसे,अनिल अधवडे, जि.प.सदस्य सागर काटकर,विजय दळवी,दिलीप गुरव,प्रशांत जोरी, विश्वनाथ वीर, अविनाश कानगुडे,शंकर जांभूळकर,संतोष अधवडे,रुपेश जाधव, सुहास बामगुडे,योगेश बामगुडे,तानाजी दिघे, दत्ता गोरे, किसन सोनार, रमेश पडवळ,विष्णु ढोरे ,माणिक जोरी ,राजेंद्र वीर,कैलास मारणे,सचिन दगडे,शिवाजी उभे,वैभव पवळे, आबा शेळके , सोमनाथ शिंदे , सचिन मरगळे, दत्ता झोरे, खंडु उभे,रामदास पोळेकर,समीर शिंदे व इतर शाखाप्रमुख, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.