logo
add image
add image
Blog single photo

नांदेच्या सरपंचपदी आरती विठ्ठल रानवडे तर उपसरपंच पदी गुलाब चिंतामण ढमाले विराजमान


मुळशी : नांदे गावाच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आरती विठ्ठल रानवडे व उपसरपंच पदी गुलाब चिंतामण ढमाले यांची निवड झाली. दोन्ही पदासाठी निवडणूक झाली यामध्ये सरपंच पदासाठी आरती रानवडे व   प्रिती करंजावणे यांच्यात लढत झाली यामध्ये आरती रानवडे यांना सहा तर प्रिती करंजावणे यांना तीन मते मिळाली. उपसरपंच पदासाठी गुलाब रानवडे आणि सयाजी रानवडे यांच्यात लढत झाली. यामध्ये गुलाब ढमाले यांना सहा तर सयाजी रानवडे यांना तीन मते मिळाली.
            नांदे गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच प्रशांत रानवडे यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ विकास पॅनल ने 9 पैकी 6 जागा जिंकत सलग दुसर्‍यांदा आपली सत्ता प्राप्त केली आहे.  तसेच आज झालेल्या सरपंच  व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आरती विठ्ठल रानवडे व उपसरपंचपदी गुलाब चिंतामण ढमाले यांची एकमताने निवड करण्यात आली . नांदे गावाचे माजी सरपंच  प्रशांत रानवडे यांनी आपल्या गेली पाच वर्ष नांदे गावच्या विकासात केलेले क्रांतिकारक व ऐतिहासिक कार्य घेऊन गावचा सुनियोजित व पारदर्शी कारभार करत श्री भैरवनाथ विकास पॅनलच्या रूपाने घवघवीत यश संपादित केले. श्री प्रशांत रानवडे यांच्या नेतृत्वात श्री. भैरवनाथ विकास पॅनल तयार केले होते. पुढील काळात गावचा विकास करण्याचे एकमुखी ग्वाही दिली व मान्य केले. त्याचबरोबर गावातील जुने जाणते ,  तरुण यांच्या कडूनही  आवश्यकत वाटेल तेथे मार्गदर्शन घेऊ असे संगितले. या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर  उपस्थित होते. श्री. विठ्ठल रानवडे (मा. उपसरपंच) श्री. दत्तात्रय रानवडे (पोलिस पाटील), श्री. मारुती रानवडे (मा. सरपंच),श्री. सोपान ढमाले.संतोष ढमाले.श्री. विजय डांगे (मा. सदस्य ग्रा.पं.), श्री. रोहिदास रानवड़े.श्री. ज्ञानोबा जाधव, श्री. मारुती मारणे, श्री. सचिन डांगे, श्री. भानुदास करंजावणे, श्री.समीर करंजावने. श्री. शेखर रानवडे, श्री. अजित ओव्हाळ, श्यासह अनेक  कार्यकर्ते व सहकारी यांच्या साक्षीने  सर्वांच्या मार्गदर्शनाने पुढील वाटचाल करण्यास आम्ही कटिबध्द आहोत असे संगितले. 
           याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच सौ.आरती विठ्ठल रानवडे. व उपसरपंच  श्री, गुलाब चिंतामण ढमाले तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्य  श्री. सुनील सखाराम जाधव, सौ. निकिता शेखर रानवडे, सौ. हेमलता निखिल रानवडे, सौ. संघमित्रा  अजित ओव्हाळ  यांचे अभिनंदन करण्यात आले. व पुढील कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीच्या विचारांनी गावचा विकास करून गावास  प्रगती पथावर आणण्याचा संकल्प श्री. प्रशांत रानवडे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना करण्यास सांगीतले.

add image
add image
  • Blog single photo
    2021-02-09 11:47:06

    Sagar subhash ranawade

    Mi sagar ranawade mala gharkula yojane madhe ghar have ahe tya sathi mala yogya madat dyavi 7219193434 nande gav taluka mulshi dist pune

Leave Comments

Top