पौड : मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुगांव,पिरंगूट,घोटावडे फाटा व पौड येथे उड्डाणपूल बांधण्यात यावेत अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंञी नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आलेली असून जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन हि मागणी केली आहे.
चांदणी चौक ते माले दरम्यान हा रस्ता २० मीटरचा असताना प्रत्यक्ष काम माञ १० ते १५ मीटरचेच काही ठिकाणी झालेले आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.तसेच अनेक ठिकाणी कामही अर्धवट ठेवण्यात आलेले आहे.होणाऱ्या वाहतूक कोंडी कामगार,विद्यार्थी, पर्यटक यांना ञास सहन करावा लागत आहे.सदरचा रस्ता योग्य वेळेत आणि चांगल्या दर्जाचा व्हावा म्हणून कंपनीला सूचना देण्यात याव्यात.
चौपरीकरणाचे काम गेली दोन वर्षापासून सुरू आहे. यामध्ये भविष्याचा विचार करता भुगांव,पिरंगूट,घोटावडे फाटा,पौड येथे उड्डाणपूल उभारून भुगांव येथील बाह्य वळणाचा प्रश्न मार्गी लावावा असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.