मुळशी : पुणे - कोलाड महामार्गावरील गोणवडीजवळील पूल जड वाहतुकीकरिता (अवजड वाहनास) अजून पुढील २४ तास बंद राहणार असल्याची माहिती मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे.
पुणे - कोलाड महामार्गावरील गोणवडीजवळ दोन दिवसापूर्वी ढासळलेल्या दगडी पुलाला पर्यायी तात्पुरता पूल (Diversion) देण्याचे काम मागील ४८ तासापासून MSRDC & RSIPL चे तंत्रज्ञ आणि अभियंते करत आहेत. परंतु सततचा पाऊस आणि कामाचे किचकट स्वरूप, यामुळे अजूनही २४ तास हे काम पूर्ण होण्यास लागणार आहे.
तरी संबंधित सर्व यंत्रणा आणि या महामार्गावरून प्रवास करू ईच्छिणा-या प्रवाशांना सूचना आहे की, जड वाहतुकीकरिता (अवजड वाहनास) सदरचा महामार्ग पुढील २४ तास बंद राहणार आहे.