logo
add image
add image
Blog single photo

पेरिविंकल स्कूलमध्ये कारगील विजय दिवस साजरा


बावधन : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या बावधन, सूस, पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये कारगील विजय दिवस अत्यंत उत्साहात व सर्व वीर जवानांना अभिवादन करून साजरा करण्यात आला.२६ जुलै १९९९ रोजी कारगील येथे झालेल्या युद्धात हिंदुस्थान ने शत्रूला पराभूत करून विजय मिळवल्याचा हा सुवर्ण दिवस

   सूस शाखेत इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यानी वीर जवान व हुतात्मा वेशभूषा परिधान करून कारगील दिवसाचे महत्व स्पष्ट करून देशप्रती आदर व्यक्त केला. तर ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यानी कारगील विजय दिवसाचे व वीर हुतात्माचे पोस्टर तयार करून हुतात्म्यांप्रति आदर व्यक्त केला.  ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यानी कारगील विजय दिवस याबद्दल माहिती, कविता व स्पीच दिले. 

        बावधन शाखेमध्ये वीर जवानाचा हुबेहूब पुतळा उभारून सर्व कारगील वॉरीयर्स व शहीद झालेले जवान यांचे चार्ट्स तयार करून इ १० वी च्या विद्यार्थ्यानी इ ९ वी च्या विद्यार्थ्याना माहिती सांगितली. पिरंगुट व पौड शाखेतही सर्व विद्यार्थ्याना कारगील विजय दिवसाबद्दल माहिती सांगण्यात आली.

       कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, निर्मल पंडीत, रूचिरा खानविलकर, अभिजित टकले यांच्या अध्यक्षतेखाली बावधन प्री प्रायमरीच्या पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर, सूस शाखेच्या पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, पिरंगुट येथील पूनम पांढरे, सना इनामदार, पल्लवी नारखेडे , पौड शाखेच्या जिनी नायर,कला शिक्षक नीता पवार, सागर शिंदे यांच्या सहयोगाने बावधन शाखेतील येलौ हाऊस,सूस शाखेतील ब्लू हाऊस टीचर्स व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आजचा हा कारगील विजय दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सर्व वीर जवान हुतात्मे यांना श्रद्धांजली वाहून वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

add image
add image

Leave Comments

Top