मुळशी : मुळशी धरण परिसरातील घुटके हे गांव डोंगराशेजारी असून सध्या या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून किंवा भुस्खलन होऊन गावाला धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे आणि काँग्रेसच्या इतर पदाधिकाय्रांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
सध्या मुळशी तालुक्यात सर्वञ अतिवृष्टी होत असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरलेले आहे.घुटके गांव डोंगराशेजारी असून दरड पडणे किंवा भुस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावेळी येथील रहिवांशाबरोबर काँग्रेसच्या पदाधिकाय्रांनी चर्चा केली.यात आम्हाला संपर्क शाळा लांब पडते. गावात गुरं ठेवून राहायला संपर्क शाळेत जाणे आम्हांला परवडणारं नाही. गुरांना चारा व पाण्यासाठी आम्हाला गावात यावेच लागेल. त्यामुळं आमची सोय संपर्क शाळेत न करता जिल्हा परिषद शाळा घुटके येथे करावा. हि शाळा गळत असून त्यावर ताडपञी टाकून द्या आम्ही ताथे राहू. या शाळेला दरड पडण्याची झळ बसणार नाही अशी विनंती गावात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर यांनी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांना घुटके येथील शाळेतच राहण्याची सोय करावी अशी विनंती केली. याला तहसिलदार अभय चव्हाण यांनीही तात्काळ मंजूरी दिली असून घुटके जिल्हा परिषदेच्या शाळेवर काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर स्वखर्चातून उद्या ताडपञी टाकून देणार आहे.यामुळे घुटके गावात राहणाऱ्या १३ कुटुंबातील जवळजवळ ३० जणांची भुस्खलनाचा धोका कमी होत नाही तोपर्यत शाळेत राहण्याची सोय होणार आहे.
यावेळी मुळशी तालुका कॉग्रेस कमिटी अध्यक्ष गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, भोर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल जाधव, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सुहास भोते,सोशल मिडिया अध्यक्ष अमित जांभुळकर, उपाध्यक्ष उज्वल ववले,गोपाळ कदम, लक्ष्मण ठोंबरे, गणेश पवळे, शंकर बत्ताले गणेश कंधारे, कुंडलिक मांडेकर, भूषण कांबळे,अविनाश रोकडे,मंडलाधिकारी संदीप थिटे, ग्रामस्थ रामचंद्र भरणे,सिताराम कुडले,राम खंडू कुडले , दत्तू रामजी कुडले ,विष्णू कुडले हिराबाई दत्तू कुडले, गीताबाई रामचंद्र भरणे, कुंदा लक्ष्मण जोरी उपस्थित होते.