पौड : अतिवृष्टीमुळे मुळशी तालुक्यात शेती आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंञी अजित पवार यांच्याकडे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी केली आहे.
गेले तीन दिवस तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे.मुळशी धरण आणि टेमघर धरण परिसरात या अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे. वाहत असलेल्या ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले. यामध्ये नुकतीच भातलावणी केलेली शेती वाहून गेली आहे. यात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अमित कंधारे यांच्याकडून करण्यात आली आहे.