बावधन : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पिरंगूट शाखेत गुरूपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या अंगी उपक्रमशीलता बाणवणे हा वसा घेतलेल्या पेरीविंकल पिरंगुट शाखेने गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे.
पेरिविंकल पिरंगुट शाखा कोणत्याही उपक्रमात कधीच मागे नसते ते आज पुन्हा एकदा समोर आले. निमित्त होते गुरुपौर्णिमा या शाळेत साजरा करण्याच्या मोठ्या उत्सवाचे. कोरोना महामारीमुळे झालेल्या या कार्यक्रमाला केवळ ९ वी आणि १०वी चेच मर्यादित विद्यार्थी उपस्थित होते. श्री व्यास महर्षींची पूजा मुख्याध्यापक अभिजित टकले यांच्या हस्ते झाली. तसेच उपस्थित शिक्षकांचा श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कारही करण्यात आला. निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक अभिजित टकले यांनीही गुरु विषयक रंजक माहिती सांगून बदलत्या काळातही गुरूला पर्याय नाही हे विशद केले. गुरु द्रोण आणि अर्जुन, एकलव्य, सांदिपनी, आणि आरुणी, विवेकानंद आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांपासून थेट आधुनिक काळातील सचिन तेंडूलकर आणि आचरेकर अशा गुरु शिष्य परंपरेवर प्रकाश टाकला.
कोणत्याही कार्यात संस्थेच्या पदाधिकारी वर्गाचा वरदहस्त नसेल तर म्हणावे तसे यश येत नाही. आणि पेरीविंकल समुहात तर संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल आणि संचालिका रेखा बांदल या दोघांचाही सहभाग प्रत्येक कार्यक्रमात असतोच आणि त्यांचे वेळोवेळी उचित मार्गदर्शन मिळते. पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजित टकले, पिरंगुट शाखा समन्वयक रुचिरा खानवलकर माध्यमिक पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक पर्यवेक्षिका सना इनामदार तसेच पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे, बावधान शाखेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, सुस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांचेही मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.