पौड : शासनाच्या सर्व योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोवण्याचे काम आदित्य रथाच्या माध्यमातून होणार आहे.तळागाळातील नागरिकांना यांचा प्रामुख्याने मोठा फायदा होणार आहे. याबाबत सार्थ अभिमान आहे. अशाप्रकारे सर्व शिवसैनिक व युवासैनिकांनी नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात आणि सर्व शासकीय योजना राबवाव्यात.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम हे युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार/ शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पौड येथे केले.
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना शिवसेना मुळशी तालुका व युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे यांच्या संकल्पनेतुन शासन आपल्या दारी ठाकरे सरकार घरोघरी भाग - २ अंतर्गत सामान्य जनतेची अनेक शासकीय कामे लवकरात लवकरच होण्यासाठी आदित्य जनसेवा रथचा लोकार्पण सोहळा तसेच शिवसेना युवासेना जनसंपर्क कार्यलयाचे उद्घाटन सोहळा शिवसेनेचे माजी आमदार/ शिवसेना उपनेते पश्चिम रवींद्र मिर्लेकर, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे,शिव सहकार सेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे,युवासेनेचे पुणे जिल्हा विस्तारक गणेशजी कवडे यांच्या उपस्थित पौड येथे पार पडले.
यावेळी महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संघटिका संगीता पवळे,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे,म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले,उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, जि.प.सदस्य सागर काटकर, तालुकाप्रमुख सचिन खैरे,महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख ज्योती चांदेरे, युवासेनेचे तालुकाप्रमुख संतोष तोंडे, शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ,माजी उपसभापती भानुदास पानसरे, माजी तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ,भोर विधानसभा संपर्क समन्वयक कैलास मारणे, सुरेश मारणे,युवासेनेचे भोर विधानसभा कार्याध्यक्ष अविनाश कानगुडे,जेष्ठ नेते नामदेव टेमघरे,दिलीप गुरव, दीपक आबा करंजावणे,तालुका संघटक सूर्यकांत साखरे, गोविंद सरुसे,ज्ञानेश्वर केमसे,अनिल अधवडे,बाजर समितीचे संचालक अमोल मोकाशी, नागेश साखरे, तुषार पवळे, युवासेनेचे तालुका संघटक संकेत दळवी,उपतालुकाप्रमुख मोहन शिंदे, गणेश दहीभाते, सुरेश शिंदे,शिवाजी भिलारे, गणेश भोईणे,वैभव पवळे, पोपट ववले,महिला आघाडीच्या सुमनताई जोरी,हिराताई पडळघरे,राणीताई शिंदे, प्रीतम बांदल,संतोषी मारणे, शिवाजी बलकवडे, लहू लायगुडे, विश्वनाथ वीर,अनंता वाशिवले शैलेश मालपुटे,आमोल जाधव,युवा सेनेचे दत्ता झोरे,नितीन साठे,सरपंच जगदीश लांडगे,मनोहर राऊत,भाऊ आखाडे,शुभम साखरे, कालिदास शेडगे,रूपेश जाधव,अनंता राऊत,दैवशाली पवळे,तानाजी भोयणे,विजय पिंगळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सहआयोजन भोर-वेल्हा-मुळशी संपर्क समन्वयक कैलास मारणे, शिव सहकार सेनेचे संघटक ज्ञानेश्वर डफळ, शिवसेना समन्वयक हनुमंत सुर्वे, दीपक करंजावणे, अनिल अधवडे,संतोष बुचुडे,गोविंद सरुसे,युवासेना तालुका अधिकारी संतोष तोंडे,युवासेना संघटक संकेत दळवी,शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजी भिलारे, युवासेना कार्याध्यक्ष राम गवारे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसहकार सेनेचे संघटक ज्ञानेश्वर डफळ यांनी केले तर आभार अनिल अधवडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व युवासेनेचे पुणे जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे प्रास्ताविकांत बोलताना म्हणाले की, अनेक शासकीय कामे आणि योजनांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. यामध्ये सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारीने सांभाळत असताना सरकारमध्ये पक्षाची मोठी भूमिका असल्याने युवासेनेचा जबाबदार पदाधिकारी नात्याने सामान्य माणूस आणि प्रशासन यामध्ये समन्वय साधून जास्तीत-जास्त सरकारी योजना सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी आदित्य जनसेवा रथ हा एक प्रयत्न आहे. सुरवातीला जवळपास ५०हून अधिक योजनांचा थेट लाभ सामान्य नागरिकांना होणार असुन त्यात टप्या-टप्याने १५० पर्यंत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.