logo
add image
add image
Blog single photo

आषाढी एकादशी निमित्त...... वारी पेरीविंकलची


बावधन : कोरोना महामारीमुळे सर्वच जग नियमांच्या बंधनात अडकलेले असताना शासनाचे सर्व नियम पाळून पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल पिरंगुट शाखेत वारक–यांच्या उत्साहात आणि संस्थेच्या थाटामाटात आजचा हा पालखीचा उत्सव पार पडला. पेरीविंकल पिरंगुट शाखा कोणत्याही उपक्रमात कधीच मागे नसते ते आज पुन्हा एकदा समोर आले.  निमित्त होते आषाढी एकादशीचे

         इयत्ता १ली ते ८वी च्या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे मनोरम दर्शन आँनलाईन माध्यमातून घडवले.  शिक्षकांनी पालखीची सजावट केली.  पारंपरिक रांगोळी रेखाटली गेली.  मुख्य प्रवेश द्वारात आषाढी एकादशी निमित्त फलक लावला.  मुख्याध्यापक अभिजित टकले यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली.  माध्यमिक पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक पर्यवेक्षिका सना इनामदार तसेच पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे यांच्या बरोबरच उपस्थित सर्व शिक्षकांनीही पालखीची पूजा केली.  सामाजिक अंतर राखून शाळेच्या आवारात एक पायी वारी आयोजित करून सर्वच विद्यार्थ्यांना पालखी सोहळा व वारीचा प्रत्यक्ष अनुभव दिला.

         आजच्या या आधुनिक काळातही आपल्या रूढी आणि परंपरा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल आणि संचालिका रेखा बांदल यांचा सार्थ हट्टच असतो.  आणि त्यासाठी ते स्वत: जातीने लक्ष घालून तसेच आवश्यक तेथे उचित मार्गदर्शन करतात. आजच्या या पालखी सोहळा आयोजनात संस्थापक अध्यक्ष  राजेंद्र बांदल सर आणि संचालिका रेखा बांदल, पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजित टकले, पिरंगुट शाखा समन्वयक रुचिरा खानवलकर माध्यमिक पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक पर्यवेक्षिका सना इनामदार तसेच पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे, बावधान शाखेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, सुस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.  

        पंढरीची वारी, पालखी संत श्रेष्ठांच्या पादुकांची, व्यवस्थापनाचे नेटके आयोजन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह, या सर्वांच्या एकत्रित परिणामाने कोरोनाच्या या काळातही पालखीचा हा सोहळा संतांच्या भक्तिभावात उत्साहात पार पडला.

add image
add image

Leave Comments

Top