logo
add image
add image
Blog single photo

दहावीच्या परीक्षेत मुळशी तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा राम गायकवाड यांच्या हस्ते सत्कार


पौड : पौड येथील साईराम बच्छाव वाघचौरे या विद्यार्थाने दहावीच्या परीक्षेत ९८.४०% गुण मिळवून मुळशी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.याबद्दल सदर गुणी मुलाचा सालाबाद प्रमाणे त्याच्या घरी जाऊन भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा संघटक राम गायकवाड यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.

         साईराम वाघचौरे याचे वडील बच्छाव वाघचौरे हे मुळशी धरणभागातील पोमगांव येथे वरिष्ठ प्राध्यापक असून गेली पंचवीस वर्ष शिक्षणाची  गंगा ते तालुक्यातील दुर्गम भागात पोहोचवितं आहेत तसेच त्यांच्या पत्नी व साईरामच्या आई या सुद्धा शेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असून हे दाम्पत्य दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचं महत्वपूर्ण कार्य करत आहेत. 

          या प्रसंगी पत्रकार,विमा सल्लागार संतोष कांजणे ,  दयानंद शिरसाठ, रोहिदास धुमाळ, कोळावडे येथील शिक्षक खेडकर सर, कुळे शाळेचे प्राध्यापक गायकवाड सर उपस्थित होते. दहावी - बारावी मध्ये प्रथम आलेल्या मुलांचा घरी जाऊन सत्कार राम गायकवाड आणि मित्र परिवार गेली ३१ वर्षापासून सातत्याने मुळशी तालुक्यात करत आहेत. याप्रसंगी राम गायकवाड यांनी तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

add image
add image

Leave Comments

Top