पौड ( ता.मुळशी ) येथील सरपंचपदी अपेक्षेप्रमाणे जगदिश रामचंद्र लांडगे यांची तर उपसरपंचपदी रसिका धनजंय जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीवेळी नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य जगदिश लांडगे, प्रमोद शेलार, अजय कडू, प्रशांत वाल्हेकर,प्रकाश शिंदे, प्रीती आगनेन,रसिका जोशी, मोनाली ढोरे,नंदा नवले, आशा जाधव,वंदना भोयणे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच आणि उपसरपंच निवडीवेळी जगदिश लांडगे यांनी सरपंचपदासाठी तर रसिका जोशी यांनी उपसरपंचपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दुसरा कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
युवासेना तालुका संघटक संकेत दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी यशवंत पिंगळे,सचिन सदावर्ते, बाळासाहेब रायरीकर,किरण आगनेन, भगवान ढोरे,चंद्रकांत शेलार, शामराव वाचकवडे, विनायक जोशी, शामराव नवले, रामभाऊ वाल्हेकर,श्रीकांत केणी, सागर ढोरे, मयूर मखी,नवनाथ लांडगे, सागर लांडगे, दशरथ लांडगे, आशुतोष पिंगळे, सुहास पिंगळे, धनंजय जोशी, पोलिस हवालदार संदीप सकपाळ उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. बी. झंजे, ग्रामसेवक विजय कदम,ग्रामपंचायत लिपिक राजेंद्र वाव्हळ यांनी कामकाज पाहिले.