पौड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे आणि शिवसंपर्क मोहिमेचे औचित्य साधून युवासेना आयोजित शासन आपल्या दारी...ठाकरे सरकार घरोघरी भाग -२ या कार्यक्रमाअंतर्गत आदित्य जनसेवा रथ लोकार्पण सोहळा आणि शिवसेना-युवासेना पौड येथील कार्यालयाचा उदघाटन सोहळा सोमवार दि.१९ रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र समनव्यक रवींद्र मिर्लेकर,युवासेना विस्तारक गणेश कवडे आणि शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि मुख्य आयोजक असलेले युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांनी ही योजना विशेष करून ग्रामीण भागातील लोकांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी असून यातून प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सामंजस्य साधून लोकांची कामे आणि सरकारी योजना या आता थेट लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला जवळपास ५० हुन अधिक योजना आणि कामांचा यात नागरिकांना थेट लाभ घेता येणार असून त्या टप्प्या टप्प्याने १५० पर्यंत करण्याचा प्रयत्न असून सरकारी कामे, योजना यांसोबतच शिक्षण,रोजगार,आरोग्य अशा अनेक विषयांना यातून थेट हात घालुन लोकांच्या अडचणी सोडविल्या जातील असे अविनाश बलकवडे यांनी सांगितले.
या वर्षी मौजे माले येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी भाग-१ या कार्यक्रमाला मिळालेल्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि त्यातून प्रत्यक्षरीत्या समजलेल्या लोकांच्या अडचणींमुळे या योजनेची प्रेरणा मिळाली असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सहआयोजन भोर-वेल्हा-मुळशी संपर्क समन्वयक कैलास मारणे,शिवसहकार सेना तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ,शिवसेना समन्वयक हनुमंत सुर्वे,दिपक करंजावणे,अनिल आधवडे,संतोष बुचडे, युवासेना तालुका अधिकारी संतोष तोंडे,शिवसेना संघटक गोविंद सरूसे , युवासेना संघटक संकेत दळवी,शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजी भिलारे, युवासेना कार्याध्यक्ष राम गवारे यांनी केले आहे.