logo
add image
add image
Blog single photo

पेरिविंकलची १००% निकालाची परंपरा कोविड काळातही कायम


बावधन : चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूलच्या बावधन, सूस व पिरंगुट या सर्व शाखानी १० वी च्या १००% निकालाची परंपरा कायम ठेऊन या वर्षीही आपला अव्वल दर्जा कायम राखला आहे.

       बावधन शाखेच्या कांचन सोनवणे हिने ९३.२०टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला तर हर्षल अर्जुने याने ९१.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर दर्शन गौडा याने ९०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

        सूस शाखेमधून नारंगी कुमावत हिने ९०.४०% टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर आंचल शुक्ला हिने ९०.२०%  गुण पटकावून द्वितीय क्रमांक मिळवला तसेच दामिनी कुमावत हिने ८८.८०% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावून प्रथम बॅच ने १००%निकालाचा आदर्श घालून दिला.

         पिरंगुट शाखेमधून संस्कृती राऊत हिने ८५.४०% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला तर आदिती तापकीर हिने ८१.६०%गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर प्रसाद पात्रेकर याने ७८.२०% गुण घेऊन तिसरा क्रमांक मिळवला असून प्रथम बॅच च्या १००% निकालाचा लौकिक दाखऊन दिला. 

     पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल च्या या चढत्या आलेखाचे व या उत्तुंग यशाचे शिलेदार पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूलस अँड जूनियर कॉलेजेस चे संस्थापक अध्यक्ष मा.राजेंद्र बांदल ,संचालिका सौ रेखा बांदल,  बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे , रुचीरा खानविलकर, सूस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित , पर्यवेक्षिका शिल्पा क्षीरसागर, शुभा कुलकर्णी, पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजित टकले, पर्यवेक्षिका पूनम पांढरे, सना इनामदार या सर्वांनी या निकालासाठी अथक परिश्रम घेउन हे १००% निकालाचे अवजड शिवधनुष्य पेलले.

      यासाठी सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याच्या प्रयत्नांनी हे यश प्राप्त झाले आहे  १००% निकालाच्या या वाट्याचे श्रेय पेरिविंकल समूहाचे सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक , विद्यार्थी व पालकवर्ग या सर्वांना जाते असे प्रतिपादन पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मा राजेंद्र बांदल यांनी सर्वांचे अभिनंदन करताना केले.

add image
add image

Leave Comments

Top