logo
add image
add image
Blog single photo

गरजूंना मदत हेच खरे पुण्य कर्म : संग्राम थोपटे


पिरंगूट : कोरोना काळात प्रशासनाच्या बरोबरीने सामाजिक संस्थांनी गरजूंसाठी केलेले मदत कार्य मोलाचे आहे. गरजूंना मदत करणे हेच खरे पुण्यकर्म आहे. असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.

       कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या कुटुंबियांना राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचा श्री शिवसमर्थ बचत गट, आबासाहेब शेळके मित्रमंडळ व सागर बॅटरी अँड ऑटो  इलेक्ट्रिकल्स या सामाजिक संस्थांनी एकत्र येत मुळशी तालुक्यातील ८५ गरुजू कुटुंबियांना आमदार संग्राम थोपटे,प्रसिद्ध लेखिका मृणाली चितळे,दुवा संस्थेच्या अर्चना गोगटे व माधवराव शेळके यांच्या हस्ते  विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. पिरंगुट येथील आदिशक्ती प्रेरणा केंद्रात हा साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी आमदार थोपटे बोलत होते.

        यावेळी तालुक्यातील २० गावांमधील गरजूंना श्री शिवसमर्थ बचत गटाच्या वतीने  किराणा साहित्य व  रोजगारासाठी शिलाई मशीन देण्यात आली तर आबासाहेब शेळके मित्र मित्र मंडळाच्या वतीने आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्रास ग्रंथालय कपाट व गरजूंना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पिरंगुटचे नवनिर्वाचित उपसरपंच राहुल पवळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

       या प्रसंगी चिंतामणी चितळे, अनिल व्यास,काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सुहास भोते, पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, युवा नेते मधूर दाभाडे, माजी सरपंच भाऊ मरगळे, शाकिर शेख,अभय मठ, विनायक गोगटे, रामभाऊ पवळे, मिनाथ कानगुडे उपस्थित होते. सुञसंचालन संतोष गावडे व योगेश गोसावी यांनी केले .प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी तर आभार ज्ञानेश्वर पवळे यांनी मानले.

add image
add image
  • Blog single photo
    2021-07-14 11:39:09

    भरत गणपत फाटक

    मुळशी तालुक्यातील सर्व सदस्य व विजेते ह्यांचे अभिनंदन ,येणारा प्रत्येक दिवस हा भोर वेल्हा मुळशी आदरणीय सुप्रियाताई व आदरणीय संग्राम दादा ह्यांच्या युतीचा असेल भरत गणपत फाटक, मु. शिरवली मुळशी💐👏👏

Leave Comments

Top