logo
add image
add image
Blog single photo

पौड येथे एकाच ठिकाणी सापडले ४९ कोरोना बाधित


पौड : गेली काही दिवस पौड गावामध्ये कमी झालेली कोरोना संख्या झपाट्याने वाढली असून पौड गावात असलेल्या एका नर्सिग प्रशिक्षण केंद्र येथे ४९ पाँझिटीव रूग्ण सापडले आहेत. या सर्व रूग्णांची रँपिड टेस्ट निगेटीव आली होती माञ आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर हे सर्व रूग्ण पाँझिटीव सापडले असल्याची माहिती मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली आहे.

       पौड येथे असलेल्या या नर्सिग प्रशिक्षण केंद्रात सोमवारी ४० पाँझिटीव रूग्ण सापडले तर मंगळवारी तिथे असलेल्या सर्व ३०० जणांची रँपिड टेस्ट करण्यात आली.यामध्ये ९ पाँझिटीव रूग्ण मिळून आले असून या ४९ जणांवर हिंजवडी येथील विप्रो येथे उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चांगली आहे.

         पौड येथे असलेल्या नर्सिग हाँस्टेल येथे ४९ पाँझिटीव रूग्ण सापडले आहेत.या सर्वांना विप्रो येथे उपचार सुरू असून सगळ्याची तब्येत चांगली आहे. माञ येथे संपर्कात आलेल्या सर्वांनी होमक्वांराटाईन व्हावे. पौड गावातील व्यावसायिक आणि नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करावा असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी केले आहे. 

add image
add image

Leave Comments

Top