logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुका शिक्षक समितीने केली उरवडे दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील मुलांना टॅबची मदत


पौड : सामजिक बांधिलकी जपत मुळशी तालुका शिक्षक समितीने उरवडे दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील पहिली ते आठवीतील सहा मुलांना टॅबची मदत केली आहे.या टँबचे वितरण पौड पंचायत समिती येथे मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार आणि उपसभापती विजय केदारी यांच्या हस्ते करण्यात आले .

        उरावडे येथील लागलेल्या आगीत अनेक कुटुंब होरपळून निघाली .त्या कुटुंबांना आपली सामजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात देणे आपले कर्तव्य मानून पुणे जिल्हा शिक्षक समितीचे उपाध्यक्ष सचिन हंगरगे व मुळशी तालुका शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून सर्व शिक्षक बंधू ,भगिनीना मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला शिक्षकांनीही प्रतिसाद दिला.

      त्यातून एकूण २३००० हजार इतकी रक्कम जमा झाली तर मुळशी शिक्षक समिती संघटनेच्या फंडातून  त्यात ७००० रुपये टाकून जळीत कुटुंबातील पहिली ते आठवीच्या सहा मुलांना एकूण ३०,००० रुपये किंमतीचे टॅबचे वितरण मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार आणि उपसभापती विजय केदारी यांच्या हस्ते करण्यात आले .

        यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी सचिन लोखंडे ,बांधकाम इंजिनियर शिवदे ,पुणे जिल्हा शिक्षक समिती उपाध्यक्ष सचिन हंगरगे, जिल्हा महिला सरचिटणीस प्रिया दसगुडे, मुळशी शिक्षक समिती अध्यक्ष संदीप दूर्गे, महिला अध्यक्ष वंदना कोल्हे , सरचिटणीस कुंडलिक कांबळे, महिला सरचिटणीस बडेकर, तालुका नेते दशरथ बेलखडे, मुळशी विभाग प्रमुख परमेश्वर शिंदे , संतोष फापाळे सर , शिवसेना उपविभाग प्रमुख भाऊ आखाडे, मुख्याध्यापिका दाभाडे मॅडम , कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष एकनाथ खोले , दखणेचे माजी सरपंच संतोष नाकती, माजी उपसरपंच सुनील दाभाडे , सेवा निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत पटेकर यांच्या उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top