बावधन: पुणे महानगर पालिकेत २३ गावांचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. बावधन बु गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी च्या वतीने पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची जबाबदारी मा.उपमहापौर दीपक मानकर यांना देण्यात आली आहे. त्याबद्दल दिपक मानकर यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी मा.विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे, मा.उपसरपंच गणेश दगडे पाटील आणि उपसरपंच दिपक दगडे पाटिल हे उपस्थित होते.
यावेळी गावचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांबरोबर लवकरच बैठक घेवून नागरिकांचे प्रश्न सोडवायला मदत करणार असे मानकर यांनी यावेळी सांगितले.