logo
add image
add image
Blog single photo

आयुष्यात आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करावी : पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचे प्रतिपादन


बावधन : प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे व प्रत्येकात गुण दडलेले आहेत फक्त ओळखता आले पाहिजे. हिरा कुठेही चमकतो तसेच माणसाने मनापासून ठरवले तर सगळ काही करू शकतो. फक्त आयुष्यात आपले ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे वाटचाल केली की कुठलीच गोष्ट अवघड नसते असे प्रतिपादन पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. 

       चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या बावधन, सूस व पिरंगुट या सर्व शाखांच्या इ. १० वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ बावधन शाखेत संपन्न झाला.  पेरिविंकलच्या साजरीकरणाच्या परंपरेला स्मरून आणि कोविड विषयक सर्व सुचना अनुसरून आज हा १० वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ शिस्तबद्ध पद्धतीने व थाटामाटात पार पडला.

    कार्यक्रमाचा प्रारंभ हा पारंपरिक सरस्वती पूजन व दीप्प्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाशजी, पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, हेमंत निंबाळकर, अँड जगदीश बेंडखळे, पंकज महाराज गावडे, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे, मुळशी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद माझीरे, आरपीआयचे नेते उमेश कांबळे तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक नीलिमा व्यवहारे, अभिजित टकले,सौ निर्मल पंडित, रुचीरा खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत मान्यवरांच्या हस्ते शाळेकडून एक आठवण म्हणून भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्याना गौरविण्यात आले. 

      पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी देखील त्यांचे अनुभव व शालेय जीवनातील प्रवास यावरील वक्तव्याचा आलेख विद्यार्थी दशा व जग यातील फरक खूप साधेपणाने सांगून सर्व विद्यार्थ्यासह शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तर पंकज महाराज गावडे यांनी स्वतःच्या स्फूर्तीपर व बोधपर वक्तव्यांचा विद्यार्थ्यांस भावी पिढी घडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. कितीही मोठे झालात तरी शाळेला व शिक्षकांना कधीही विसरू नका असा गुरुमंत्र यांनी सर्वांना दिला. 

        कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, निर्मल पंडीत, रुचिरा खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन शाखेतील शिक्षक  अभिजित टकले, पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर, शिल्पा क्षीरसागर, शुभा कुलकर्णी, पूनम पांढरे, सना इनामदार व पल्लवी नारखेडे या सर्वांच्या सहयोगाने करण्यात आले होते.

add image
add image

Leave Comments

Top