मुळशी : संसदरत्न,लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशी धरण भागातील ६ शाळातील इयत्ता ५ वी ते १० वी च्या १०२८ विध्यार्थीना मोफत वह्याचे वाटप मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंकुश मोरे यांच्या वतीने करण्यात आले. या वही वाटपाचा माले येथील सेनापती बापट हायस्कूल येथे शुभारंभ करण्यात आला
या कार्यक्रमाला मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माजी उपाध्यक्ष विनोद कंधारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास दगडे, धुळाजी कोकरे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश जोरी,माजी सरपंच सुनिल पासलकर, पौड गण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विजय येनपुरे, मुळशी धरण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विजय कानगुडे,युवा नेते सुहास शेंडे,उपसरपंच नितीन मारणे,माजी उपसरपंच राहुल वाघमारे,निवेचे सरपंच सुनिल गाऊडसे, पोलिस पाटील गणेश निवेकर,लक्ष्मण कोंढेकर, ताम्हिणी हायस्कूलचे केदार सर ,शिंदे सर ,कडु सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंकुश मोरे यांनी केले तर स्वागत शितल दातीर यांनी केले.
लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुळशी धरण भागासाठी असलेल्या हायस्कूल तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अंकुश मोरे यांनी यावेळी सांगितले.