logo
add image
add image
Blog single photo

गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलातर्फे निषेध


पिरंगूट : राज्यात होत असलेल्या गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर बजरंग दल मुळशी प्रखंड यांच्या वतीने आज घोटावडे फाटा चौकात निषेध व्यक्त करण्यात आला

         महाराष्ट्र राज्यात प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गोहत्या बंदी कायदा २०१५ साली अमलात आणुन सुध्या कायद्याची योग्य ती अंमलबजावणी केली जात नाही.राजरोसपणे राज्यात देशी गोवंशांची कत्तली होत आहेत. कायदा तयार झाला मात्र फक्त कागदावर प्रत्यक्ष अंमलांत काही ठिकाणी आणला जात नाही. त्यामुळे प्रशासनाला खडबडुन जागे करण्यासाठी व कायद्याची योग्य ती अंमलबजावणी होण्यासाठी बजरंग दल मुळशी प्रखंडतर्फे आज घोटावडे फाटा येथे निषेध करण्यात आला.

        पश्चिम महाराष्ट्र प्रांत पालक अशोक येलमार , विहिंप मुळशी प्रखंड अध्यक्ष आचार्य मंदारस्वामी यनपुरे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुळशी तालुका संघचालक कैलासआप्पा चोंधे ,  हभप. नवनाथ महाराज माझिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषद बजरंग दल मुळशी प्रखंडतर्फे भोसरीला झालेल्या देशी गोवंशाच्या हत्ये संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला.

           पौड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पवन चौधरी , पोलिस नाईक संजय सुपे व नायब तहसिलदार सरिता पाटील यांना निवेदन देऊन कायद्याची योग्य ती अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली  यावेळी विश्व हिंदू परिषद मुळशी प्रखंडचे प्रखंडमंत्री रोहन मा. निकटे , सहमंत्री विक्रांत निकटे , बजरंग दल संयोजक निखिल मारणे , सहसंयोजक विजय मरगळे , गोरक्षा प्रमुख संकेत कुडले , सहप्रमुख शंतनु निंबाळकर , पिरंगुट सहसंयोजक पंकज गायकवाड, बजरंगी कृष्णा चौधरी , संतोष शेडगे , आर्यन निकटे , रणजित धनवे , शुभम अमराळे , गणेश बलकवडे , समिर मारणे , ध्रुव मेहता व  विवेक शेलार उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top