logo
add image
add image
Blog single photo

मुळशीतील ४५ गावची सरपंच निवड उद्या आणि परवा.


मुळशी तालुक्यात ४५ ग्रामपंचायतसाठी सरपंच व उपसरपंच निवडी ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजीच होणार असून उलट सुलट होणाऱ्या चर्चाना यामुळे पूर्ण विराम मिळालेला आहे. गेली अनेक दिवस आपले समर्थक सदस्य घेऊन सहलीवर असलेल्या भावी सरपंचाचा यामुळे जीव भांड्यात पडला आहे. 

         मुळशी तालुक्यातील ४५ पैकी ३६ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. याची मतमोजणी १८ जानेवारी रोजी झालेली होती तर ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये ९ फेब्रुवारी भोईणी,  रिहे, शेरे, मुठा, भुकूम, चांदे, नानेगांव, मुलखेड, जांबे, काशिग, घोटावडे, कासारआंबोली, पौड, अंबडवेट, मारूंजी, कासारसाई, हिंजवडी, नांदे, माण, लवळे, उरवडे, चिंचवड, वाळेण या २३ तर १० फेब्रुवारीला बोतरवाडी, खांबोली, मांदेडे, आंदेशे, हाडशी, भरे, चाले, आंदगांव, कोळावडे, नेरे, भालगुडी, कातरखडक, नांदगांव, साठेसाई, कुळे, मुगावडे, दखणे, चिखलगांव, खेचरे, अकोले, कोळवण, आंबेगांव २२ ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच  निवड होणार आहे.

add image
add image

Leave Comments

Top