logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट,कला व सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी चेतन डोख यांची निवड


पौड : मुळशी तालुक्यातील बेलावडे गावातील अभिनेते कु. चेतन डोख यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट कला व सांस्कृतिक विभाग मुळशी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.हि निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी पुणे शहर सरचिटणीस संतोष डोख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमर गवळी,संघटक शैलेश परदेशी, सरचिटणीस रविंद्र ढमाले, संपर्क प्रमुख धनंजय वाठारकर हे उपस्थित होते. 

        यावेळी चेतन डोख यांनी सांगितले की, संघटनेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वास मी कधीही गमवणार नाही.  मी मुळशी तालुक्यात सुंदर आणि भव्यदिव्य नाट्यगृह पक्षाच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न करेन तसेच तालुक्यात होणारे चित्रपट निर्मितीची ठिकाणे वाढवून कला व सांस्कृतिक विभागाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

add image
add image

Leave Comments

Top