पौड : मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास भोते यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून मुळशी तालुक्यातील गरजू १००० नागरिकांना छत्री वाटप करून साजरा केला आहे. या छञी वाटपाचा शुभारंभ आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, राजगड साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके, मुळशी कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव, मुळशी तालुका सोशल मिडिया अध्यक्ष अमित जांभुळकर, युवा उद्योजक रोहिदास भोते, एकनाथ खोले, अविनाश शिंदे, गणेश पवळे, शंकर बत्ताले, उज्वल ववले, गणेश कंधारे, विक्रम पवळे या प्रसंगी आदी मान्यवर उपस्थित होते.