पौड : भोर - वेल्हा - मुळशीचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळावे अशी निष्ठावान कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
आमदार संग्राम थोपटे यांचे वडील जेष्ठ नेते अनंतराव थोपटे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत.अनंतराव थोपटे यांचे नांव मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले असताना १९९९ साली त्यांचा विधानसभेला पराभव झाला. २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत ते पुन्हा विजयी झाले. माञ २००९ सालापासून अंनतराव थोपटे सक्रिय राजकारणातून बाजूला झाले व २००९ साली त्यांचे पुञ संग्राम थोपटे नवीनच निर्मित झालेल्या भोर वेल्हा मुळशी मतदार संघातून विजयी झाले.२०१४ आणि २०१९ साली त्यांनी या मतदार संघातून विजय मिळवत हँट्रिक साधली. २०१४ साली पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचे एकमेव आमदार म्हणून संग्राम थोपटे होते.
पडत्या काळात पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. माञ सरकार असतानाही संग्राम थोपटे यांना मंञीपदापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले.यावेळी तरी आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होऊन त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाईल अशी अपेक्षा भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
जेष्ठ नेते अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यांच्यावर अनेक संकटे आली माञ त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही.तसेच आमदार संग्राम थोपटे यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केलेले असून संग्रामदादांना विधानसभा अध्यक्ष पदाची संधी दिली गेली पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी व्यक्त केली.
भोर विधानसभा मतदार संघातून आमदार संग्राम थोपटे यांनी हँट्रिक करत विजय मिळविला आहे. त्यांच्या झंझावती कामामुळे तीनही तालुक्यात पक्षाला चांगले दिवस आलेले असून अनेक विकासकामे तीनही तालुक्यात सुरू आहे. त्यांच्याकडे असलेल्या कार्यकुशलतेचा फायदा पक्षाने करून घेत आमदार संग्राम थोपटे यांची वर्णी विधानसभा अध्यक्षपदी लावावी, अशी मागणी मुळशी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सुहास भोते आणि युवा नेते मधुर दाभाडे यांनी केली आहे.