पौड : सगळा समाज जीव मुठीत धरून बसला होता तेव्हा आशा सेविकांनी वाड्या वस्त्या घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली.यामुळे अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवला नाही.आशा सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.त्यांच्या केलेल्या कार्याला तोड नाही. कोरोनाचा काळ संधीचा काळ म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.३० जून ते २२ जुलै पर्यत राष्ट्रवादी संघटन संपर्क अभियान राबविले जात असून कोरोनाचे नियम पाळून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पौड येथे केले.
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यात कोरोना काळात काम करणाऱ्या १२५ आशा वर्कर,गट प्रवर्तक यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करत रेनकोटचे वाटप करण्यात आले. पौड येथील सेनापती बापट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी प्रदीप गारटकर बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते रामचंद्र ठोंबरे, राजाभाऊ हगवणे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, गटविकास अधिकारी संदिप जठार, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, पंचायत समिती सदस्य कोमल वाशिवले, राधिका कोंढरे, वैशाली गोपालघरे, चंदा केदारी,सुनिल चांदेरे, दिपाली कोकरे, दगडूकाका करंजावणे, दिलीप आण्णा दगडे, सुनिल वाडकर, कालिदास गोपालघरे, निलेश पाडाळे, भगवान नाकती,लहूशेठ चव्हाण, उज्वला मारणे, सतिश सुतार, जितेंद्र इंगवले, विलास अमराळे,विजय येनपुरे, विजय कानगुडे, प्रविण धनवे उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या माध्यमातून महिलांचे तसेच मुळशीचे प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. आशा सेविकांचे मानधन वाढवून देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या आग्रही आहेत.लवकरच यावर त्या तोडगा काढतील.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रामचंद्र ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे यांचीही भाषणे झाली. तर प्रा.संतोष गावडे यांनी सूनसंचलन केले.
Manoj Ashok kasbekar
Tai wish you many many happy returns of the day wish you happy birthday 🎂