logo
add image
add image
Blog single photo

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन


पौड : बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोरोना काळात महत्वपूर्ण जबाबदारी बजाविणाय्रा आशा वर्कर्स यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून सर्व आशा वर्कर्स भगिनींना रेनकोट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,कार्याध्यक्ष अंकुश मोरे आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिली आहे.

      सदर कार्यक्रम  बुधवार दि.३० जून रोजी,सकाळी १० वाजता, पंचायत समितीतील सेनापती बापट सभागृह पौड येथे होणार आहे. तर कोंढावळे येथे वृक्षरोपण कार्यक्रम,पौड येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये १)अनेमिया (रक्तशय) तपासणी २) ब्लड शुगर तपासणी ३)डायबिटीस उपचार व तपासणी  ४)दाताची तपासणी ५) तोंडाची तपासणी (कर्करोग तपासणी) ६) स्थनाचा कर्करोग तपासणी ७) HIV - रक्त तपासणी ८) TB तपासणी होणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली..

add image
add image

Leave Comments

Top