पौड - आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, अशी मागणी मुळशी तालुक्यातील आशा सेविका व गतप्रवर्तक यांनी केली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच मुळशी तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी ही मागणी केली. दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसेच त्यांना कामावर कायमस्वरूपी म्हणून रूजू करावे. कामावर घेताना त्यांना वयाची कोणतीही अट घालू नये. करोना आजारासाठी असलेले पन्नास लाख रुपयांचे विमा कवच इतर आजारांनाही मिळावे. तसेच आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांचा सन २००८ पासून फरक देण्यात यावा.