logo
add image
add image
Blog single photo

भोर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी प्रविण धनवे


पौड : भोर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी दारवली - धनवेवाडी येथील प्रविण धनवे यांची निवड करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रविण धनवे यांना नियुक्तीपञ देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले,सभापती पांडुरंग ओझरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती कोमल वाशिवले, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      प्रविण धनवे यांनी मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केलेले असून  दारवली गावचे ते कमी वयात उपसरपंच होते. भोर विधानसभा मतदार संघात युवकांची मोठी ताकद तयार करणार असून राष्ट्रवादीचे विचार जनमाणसांत रूजविणार असल्याचे निवडीनंतर प्रविण धनवे यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top