logo
add image
add image
Blog single photo

पौड येथे भाजपाचे चक्काजाम आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध


पौड :  भारतीय जनता पार्टी मुळशी तालुक्याच्या वतीने पौड येथे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत पुणे कोलाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.


         यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, पुणे जिल्हा भाजपा सचिव सुवर्णा जोशी, कार्यालयीन मंञी वसंत चोरघे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष  वैशाली सणस, पुणे जिल्हा भाजयुमो सरचिटणीस जीवन साखरे, हनुमंत चव्हाण, राहूल इंगवले,निता गुरव, काळूराम गायकवाड,अमोल धनवे,मारूती कुरपे,प्रल्हाद कंधारे,सरपंच मिंनाथ कानगुडे,सुनील दगडे, यशवंतराव धुमाळ,वसंत चोरघे,तानाजी वाघमारे, सुरेश ठोंबरे, जितेंद्र माझिरे,समीर मारणे,संध्या देशपांडे,अर्चना वाघ,अभिषेक वाचकवडे, सतीश कुलकर्णी, देविदास धुमाळ,पुंडलिक हुलावळे,आप्पा ढमाले,शशिकांत गुजर,अनिल गुरव, पांडुरंग जाधव,सुनील पाडळे,सदाशिव मोरे,मनोहर सणस,दीपक वाळूंजकर,योगेश कुमावत,रोहन ठोंबरे,गौरव ठोंबरे तसेच मुळशीतील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


      राज्य शासनाने काढलेल्या वेळ काढू पणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले असून हे आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. माञ हे सरकार ओबीसी आरक्षण केंद्र सरकारमुळे रद्द झाले असल्याचे खोटे सांगत आहे. अशी टीका भाजपाचे तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी केली आहे.


      तर पुणे जिल्हा भाजपा सचिव सुवर्णा जोशी म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे. विद्यार्थी व कामगार वर्गाला नौकरीमधील आरक्षणही मिळणार नाही.

add image
add image

Leave Comments

Top