logo
add image
add image
Blog single photo

अंबडवेट येथील आदिवासी वस्तीवर आरोग्य तपासणी


 पौड : अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त  शुक्रवार ( दि. २५)  रोजी मुळशी तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी कल्याण संघ यांच्या वतीने व मुळशी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष,विशेष कार्यकारी अधिकारी आकाश जाधव यांच्या सहकार्याने अंबडवेट  येथील आदिवासी वस्तीमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत आरोग्य तपासणी, औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले.डॉ.अक्षय मालपोटे यांनी रुग्ण तपासणी केली व रुग्ण समुपदेशनही केले.

             यावेळी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम  मातेरे, आदिवासी कल्याण संघ मुळशी तालुका अध्यक्ष शंकर बत्ताले, मुळशी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य अंकुश जाधव, दिनेश ढमाले, माजी ग्रामपंचायत सदस्य संगीता जाधव, बेलावडे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रताप ढमाले, दर्शन कदम, रोहित शिंदे,आदी उपस्थित होते.शिबिरात सुमारे ५०  कुटुंबांची तपासणी करण्यात आली.

   काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात संकल्प सप्ताह आयोजित केला आहे. त्या अनुषंगानेच हा कार्यक्रम आयोजित केला असून तालुक्यातील संपूर्ण आदिवासी वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहे.

        शंकर बत्ताले

अध्यक्ष आदिवासी कल्याण संघ

add image
add image

Leave Comments

Top