logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुक्यात दोन नवीन मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा सुरू


पौड : मुळशी तालुक्यात आजपासून  पुणे स्टेशन ते दारवली - पौड आणि मार्केटयार्ड ते लव्हार्डे अशा पीएमपीएमएलची नवीन दोन मार्गिका सुरू करण्यात आल्या असून महापौर मुरलीधर मोहोळ व नगरसेविका अल्पना वरपे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करण्यात आले.दारवली आणि लव्हार्डे येथे या बस आल्या असता येथील नागरिकांनी बसला सजवून जल्लोष साजरा केला.

        लव्हार्डे येथे मार्केटयार्ड तसेच दारवली - पौड येथे पुणे स्टेशन बस सुरू करावी अशी मागणी परिसरातील नागरिक गेली अनेक वर्ष करत होते. या बस दोन्ही बाजूने दर एक तासाने सुटणार आहे. आज सकाळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका अल्पना वरपे,वासंती जाधव,सायली सायकर, भाजपाचे गणेश वरपे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती राधिका कोंढरे,सरपंच अमोल शिंदे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करण्यात आले. तर बस दारवली व लव्हार्डे येथे आली असता येथील नागरिकांनी बसला फुगे लावून सजवली. तसेच बसचे चालक आणि वाहक यांचे सत्कारही करण्यात आले.

       यावेळी दारवलीचे सरपंच नरेश बलकवडे, पौडचे सरपंच जगदीश लांडगे, उपसरपंच मंगेश बलकवडे, पोलिस पाटील संजय पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, प्रशांत वाल्हेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आकाश सणस, अमृता थरकुडे, सुरेश बलकवडे,पौडगांव व्यापारी संघाचे संस्थापक विशाल राऊत,अध्यक्ष नवनाथ लांडगे, गणेश शिळवणे, शुभम बलकवडे, बाळासाहेब ढमाले,पौडचे ग्रामविकास अधिकारी विजय कदम उपस्थित होते.

     तर लव्हार्डे येथे वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे,विद्यमान सरपंच मिंनाथ कानगुडे ,मा.सरपंच तानाजी मारणे ,शिवसेनेचे विभागप्रमुख राजाभाऊ गुंड ,रामचंद्र मरगळे, सरपंच अस्मिता मारणे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे ,सुरेश मारणे, मा.उपसरपंच अशोक चवले,वेगरेचे महादेव कोकरे, दगडू मारणे ,बबन मारणे, सदाशिव उभे, बंडू आप्पा पासलकर,अर्चना चवले उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top