logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवा : युवक काँग्रेसची मागणी


पौड : कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेची तीव्रता लक्ष्यात घेता मुळशी तालुका वेगाने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी मुळशी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्याकडे करण्यात आली आहे.

       कोरोनाने सर्वञ थैमान घातला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबाना नाहक ञास सहन करावा लागला असून रोजगार व्यवसाय बुडाले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहे. दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी मुळशी तालुक्यात सुरू असलेले लसीकरणाचा वेग वाढवावा अशी मागणी मुळशी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्याकडे करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले आहे.

         यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, कृषी उत्पन बाजार समिती  संचालक संदीप केदारी, उज्वल ववले, मदन सांळुके यांनी हे निवेदन दिले आहे.

add image
add image

Leave Comments

Top