logo
add image
add image
Blog single photo

पेरीविंकल शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस योगसाधनेतून साजरा


बावधन : पेरीविंकल शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस कोरोनाचे सर्व नियम पाळत योगसाधनेतून दिमाखदारपणे साजरा झाला.  योगसाधना करून आपण आपली प्रतिकारशक्ती नक्कीच वाढवू शकतो आणि ती आजच्या काळात अत्यंत महत्वाची आहे हेच आजचा यातून दाखवून दिले. 

        पेरीविंकलच्या  पिरंगुट शाखेत  आंतरराष्ट्रीय योग दिवस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल तसेच मुख्याध्यापक अभिजीत टकले, पिरंगुट शाखा समन्वयक रुचिरा खानविलकर यांच्या हस्ते पार पडला.  

        सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शाखेच्या १ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी केले गेले.  सदर कार्यक्रमात शाखेच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सना इनामदार तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे उपस्थित होत्या.  कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता.  

     पर्यवेक्षिका पूनम पांढरे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. प्रमुख पाहुण्या म्हणून  स्मिता जलतकर उपस्थित होत्या.  योगासनाच्या अधिकृत शिक्षिका असलेल्या या स्मिता मॅडम योगांचा उपयोग औषधोपचार या दृष्टीनेही करत असतात.  कोरोना काळात त्यांचे हे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. गेली पाच वर्षे त्यांच्या अभ्यासाचा विषय योगा आणि मानवी आयुष्य हाच आहे.   प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संचालिका रेखा बांदल यांनी केले. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून मानवी आयुष्यातील योग साधनेचे महत्व विशद केले.  त्याच्याच मार्गदर्शना प्रमाणे उपस्थितांनी प्राणायाम आदि आसनेही करून योग हा एक दिवस नव्हे तर कायमच करण्याचा उपक्रम आहे हा आदर्श विद्यार्थांसाठी घालून दिला.  मुख्याध्यापक अभिजीत टकले यांनी योग दिनाची सुरुवात कशी झाली आणि गेल्या सात वर्षात साजरे केलेले योगदिन आणि त्या त्या वर्षीचा विषय यांच्या माहितीतून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.  

      संस्थेच्या संचालिका रेखा बांदल म्हणाल्या की ‘ योग हा अति प्राचीन असून वेदकालापासून आजवर आणि जगात सर्वत्र अनुसरला जातो.  आपल्या शरीरातील चक्रे नियमित ठेवण्यासाठी योगांची गरज असते.  भगवान श्रीकृष्ण व  पतंजली मुनींच्या दाखल्यातून त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

             आजच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक उपस्थित होते.  या संधीचा लाभ घेऊन व्यवस्थापनाने कोविड योद्धा म्हणून सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.  या सत्काराची पार्श्वभूमी शाखेच्या समन्वयक रुचिरा खानविलकर यांनी थोडक्यात सांगितली.  कोविड महामारीच्या काळातही आपले काम सुरळीत पार पाडणा–या आपल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची दखल व्यवस्थापनाने घेतली हे पेरीविंकल  संस्थेचे वेगळेपण व महत्त्व सुद्धा.

पिरंगुट शाखेच्या सर्वच शिक्षकांनी आजच्या या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.  फलक लेखन, रांगोळी, योगविषयक भित्तीपत्रके, विद्यार्थाना देण्यासाठी माहितीचे संकलन अशी सर्वच कामे शिक्षकांनी चोख पार पाडली आणि या कार्यक्रमाला यशस्वीतीचे कोंदण देऊ शकलो.

add image
add image

Leave Comments

Top