logo
add image
add image
Blog single photo

आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून रमेश ससार यांचे भेट घेऊन सात्वंन


पौड : पञकार संघ मुळशीचे अध्यक्ष रमेश ससार यांची आमदार संग्राम थोपटे यांनी राहत्या घरी भेट घेऊन सात्वंन केले असून दैनिक प्रभातचे पौड येथील पञकार सचिन केदारी यांचेही आमदार संग्राम थोपटे यांनी फोनवरून चर्चा करत सात्वंन केले आहे.

       पञकार संघ मुळशीचे अध्यक्ष रमेश ससार यांचे वडील ह.भ.प पोपटराव ससार गुरूजी आणि दैनिक प्रभातचे पौड येथील पञकार सचिन केदारी यांचे ह.भ.प. बाळकृष्ण केदारी यांचे नुकतेच निधन झाले. मुळशी तालुक्यात राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक,कला -क्रीडा क्षेञातील व्यक्तीनी रमेश ससार आणि सचिन केदारी यांचे प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून सात्वंन केले. 

      आज आमदार संग्राम थोपटे हे मुळशी तालुक्यात आले असता त्यांनी चांदे येथील रमेश ससार यांच्या घरी जाऊन सात्वंन केले. तर करमोळी येथील रहिवाशी असलेले सचिन केदारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांचेही सात्वंन केले. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर, संदीप केदारी, युवा नेते मधुर दाभाडे, संदीप हुलावळे, सुरेश पारखी, अमित जांभुळकर, कुमार शेडगे,उज्वल ववले उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top