logo
add image
add image
Blog single photo

जांबे येथील रिक्षाचालक संतोष जैद यांचा आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सन्मान


पिरंगूट : कोरोना काळात मुळशी तालुक्यातील कोरोना रूग्णांना मोफत रिक्षा उपलब्ध  करून दिल्याबद्दल जांबे येथील रिक्षाचालक संतोष जैद यांचा मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अकरा हजार रूपये रोख तसेच सन्मानचिन्ह देऊन भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

        कोरोना काळात जांबे येथील संतोष जैद या रिक्षा चालकाने ज्या कोरोना रूग्णांना रूग्णवाहिका उपलब्ध होत नाही त्यांना आपल्या रिक्षातून रूग्णालयात तसेच इतर ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता ने - आण केली. संतोष जैद यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची दखल अनेक ठिकाणी घेण्यात आली. तसेच याचा आदर्श घेऊन काही जणांनी असाच उपक्रम सुरू केले. या घटनेची नोंद मुळशी तालुका काँग्रेस कमिटीनेही घेत रिक्षाचालक संतोष जैद यांचा आज पिरंगूट येथे आमदार संग्राम थोपटे यांचा उचित सन्मान केला.

       यावेळी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, माजी सभापती बाळासाहेब पवळे, युवक अध्यक्ष सुहास भोते,माजी उपसभापती भानुदास पानसरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम गायकवाड,दादाराम मांडेकर, युवा नेते मधुर दाभाडे, सुरेश पारखी, संदीप केदारी, कुमार शेडगे, संदीप हुलावळे, उज्वल ववले, सरपंच चांगदेव पवळे, ग्रामपंचायत सदस्य महेश वाघ,राहूल पवळे, नामदेव निकटे, अनिल गोडांबे,आकाश जाधव उपस्थित होते.

        

add image
add image

Leave Comments

Top