पिरंगूट : शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या संकल्पनेतून सूस येथे सुरू असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती कोविड केअर सेंटरमध्ये तुर्केवाडकर,इंगोले व धेंडे कुटुंब कोरोणा मुक्त झाले आहेत.
सुस येथे राजकुमार तुर्केवाडकर ( रा. सुसगाव. वय ३९) ,समता राजकुमार तुर्केवाडकर ( वय ३६) ,सारा राजकुमार तुर्केवाडकर (वय १२) ,स्पंदन राजकुमार तुर्केवाडकर (वय ६) ,विकास इंगोले (वय २०),संघर्ष इंगोले (वय १६) राहणार , कामिनी धेंडे (वय ३२),हर्ष धेंडे (वय ८) हे उपचार घेत होते.कोविड सेंटर मध्ये वेळेवर औषधे,नाष्टा,जेवण व डाॅक्टरांच्या मार्गदर्शन यामुळे या कुटुंबियांनी कोरोनावर मात केली आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख मुळशी पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या संकल्पनेतून स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती कोविड केअर सेंटर सुस मध्ये गेल्या तीन महिन्या पासुन सेवेत आहे.आता पर्यंत या सेंटर मधुन तालुक्यातील ३८० रूग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. सध्या तालुक्यात कोरोणा रूग्णसंख्या ओसरली आहे त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णसंख्या कमी आहे.
या सेंटर मध्ये वेळेवर औषधे, नाष्टा,जेवण मिळत होते.सेंटरध्ये साफसफाई व मनोरंजन चांगल्या पद्धतीचे होते.त्याचप्रमाणे २४ तास डाॅक्टर व नर्स उपलब्ध असतात अशी प्रतिक्रिया राजकुमार तुर्केवाडकर यांनी दिली.