माले : मुळशी तालुक्यातील धरण विभागात सालतर-भांबर्डे रस्त्यावरील भांबर्डे खिंडीत व कोळवली-कुंभेरी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खराब आसल्यामुळे एसटी तैलबैला गावात जाऊ शकत नाही. प्रवासी सालतर गावातुन चालत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल हेत आहे.
बांधकाम विभाग व वनविभागाने तातडीने या विषयावर तोडगा काढून रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नकुल रणसिंग यांना शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी मागणी पत्र दिले. यावेळी विभाग प्रमुख पांडुरंग निवेकर, आनंता वाशिवले, नितीन लोयरे, मुकेश लोयरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
या खिंडीचा भाग हा वनविभागाच्या अखत्यारीत येतो. बांधकाम विभाग व वनविभाग यांच्या त मतभेदांमुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नकुल रणसिंग यांनी दखल घेत त्वरीत काम चालु करण्यात येईल असे आश्वासन देऊन वनविभागाच्या वनाधिकारी अंकिता तरडे यांच्याशी विचार विनीमय करुन या रस्त्याच्या कामाबाबत सहकार्य करावी, अशी विनंती केली. त्यांनी ही सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. तसेच पोमगाव ते विसाघर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. बाबतीत चौकशी करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागकडे करण्यात आली.