logo
add image
add image
Blog single photo

भादस शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद


पौड: दरवर्षी शाळेचा पहिला दिवस म्हणजे आनंदी आनंद, एक सुंदर सोहळा, प्रत्येक बालक शाळेत पहिल पाऊल मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात टाकते, पण कोरोना मुळे सारंच अशक्य. 

मुलांना त्यांच्या आयुष्यातील हा पहिला वहिला आनंद मिळावा, ह्या हेतूने भादस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सोहळा आयोजित करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा आनंद आपापल्या घरी घेतला. 

शिक्षकांनी मुलांचा प्रवेश त्यांच्या घरी जावून, औक्षण करून, साहित्य देवून केला. शालेय दिक्षा app कसे वापरायचे याची माहिती पालक व विद्यार्थ्यांना दिली. पालक आणि शिक्षक मिळून जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. मुलांचे हातांचे कुंकवाचे ठसे घेवून एकमेकांच्या साथीने आपले भविष्य आपल्या हाती आहे ते भविष्य आपण उज्वल घडवणार अशी पालक आणि शिक्षकांनी प्रतिज्ञा घेतली. 


दिपक शाळेत  दाखल झाला-

दिपक आदिवासी मुलगा. त्याचे आई वडील पोटापाण्यासाठी कुठे तरी गेलेले. हि तीन भावंड, जी आजी सोबत राहतात.मी सकाळी त्यांच्या घरी गेले ..डोंगरावर गावापासून लांब त्यांच झोपड...मी बाहेरून आवाज दिला ..तर बाहेर यायला तयार नाही  दिपक ...शेवटी मी च आत गेले तेव्हा कुठं बाहेर आला..अंघोळ पण केली नव्हती .. शाळेत येणार का म्हंटल तर म्हटला "मला नाही यायच "...मग त्याच्या शी गोड गोड बोलून त्यांच्या झोपडीला फुगे लावले ...त्याला फुगे दिले ...हात पाय धुतले ..शाळेचा गणवेश घातला ...साहित्य , चॉकलेट दिले ..तेव्हा कुठं स्वारी खुश झाली ...आणि मग फुगे घेवून पळू लागली इकडून तिकडे ....आणि सार गोड झाल ...

- श्रीमती प्रियतमा दसगुडे

add image
add image

Leave Comments

Top