logo
add image
add image
Blog single photo

पेरिविंकलमध्ये पर्यावरण दिन उत्साहात : नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा


बावधन : ५ जून  हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन करत चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूलच्या बावधन, सूस, पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

         शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा श्री गणेशाच पर्यावरणाचासमतोल राखून करण्यात आला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या चारही शाखांमध्ये विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, वड, पिंपळ, उंबर ,चिंच अशा स्थानिक प्रकारची झाडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे,  निर्मल पंडित, रूचिरा खानविलकर, अभिजित टकले, पर्यवेक्षिका शिल्पा क्षीरसागर, पूनम पांढरे, सना इनामदार, नायर आदी मान्यवरांसमवेत त्या-त्या शाखेमध्ये करण्यात आले.

    विद्यार्थ्याना देखील त्यांच्या घरात, गार्डेन मधे किवा आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकी 1झाड लाऊन तसेच पक्ष्यासाठी क्रूत्रिम घरटे तयार करून झाडावर किंवा कुठेही ठेऊन त्याना आसरा देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या मान्यवरांनी विद्यार्थ्याना केले. तसेच पर्यावरणाविषयी माहिती किंवा निबंधाच्या लिहावा असेही सांगितले. सर्व विद्यार्थ्यानी यात उस्फुर्त पणे सहभाग घेऊन फोटो/ वीडियो देखील पाठवले. रस्त्याला कडेने बियाणे पेरून पर्यावरणाला मदत करण्यास खूप हात पुढे आले. तसेचसीड बँक करून विविध प्रकारचे बियाणे जतन करण्याची योजनाही या मुहूर्तावर राबवण्यात आली.

         सर्व शाखांचे मुख्याध्यापक, समन्वयक, पर्यवेक्षक, शिक्षक यानी ऑनलाइन पर्यावरणाला पूरक अशी प्रतिज्ञा घेतली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यात उस्फुर्त पणे सहभाग होता. पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक  राजेन्द्र बांदल व संचालिका  रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली बावधन सूस पिरंगुट व पौड या शाखेत मुख्याध्यपक नीलिमा व्यवहारे,  निर्मल पंडित, अभिजित टकले,रुचीरा खानविलकर व सर्व शाखांमधील समन्वयक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न झाला.

add image
add image

Leave Comments

Top