पौड: मुळशी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारे खराब झालेले रस्ते आठ दिवसांत दुरूस्त करण्यात यावेत तसेच कोळवण या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.
यावेळी मनसे जनहित कक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन मोहने,मुळशी तालुका अध्यक्ष गणेश जोरी,तालुका उपाध्यक्ष शुभम भोसले, सर्जेराव सोनवणे, शैलेश पळसकर, विभाग अध्यक्ष रामभाऊ वीर, लक्ष्मण वीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.