logo
add image
add image
Blog single photo

भुगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची सरपंच निकीता सणस यांची मागणी


पिरंगूट :  भुगांव येथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. तरी येथे  स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी सरपंच निकीता सणस यांनी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे केली आहे.

        भुगांव येथील नागरिकांना सध्या लसीकरणासाठी बावधन किंवा भुकूम येथे जावे लागत आहे. आँनलाईनमुळे बावधन येथे कोथरूड तसेच भुसारी काँलनी परिसरातील लसीकरण करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त आहे तर भुकूम येथे लसचा पुरवठाच कमी प्रमाणात होतो.

   भुगाव येथे मागील आठवडय़ात केलेल्या सर्वेक्षणानुसार ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांची संख्या २६०५ इतकी आहे.त्यापैकी  ८८४ नागरिकांनी पहिला तर २३० नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला असून १७२१ नागरिकांनी अजून एकही लस घेतलेली नाही.१८ ते ४५ वयोगटातील ९७३७ इतके नागरिक भुगाव येथे आहेत. कोरोना लसीकरण केंद्र भुगाव येथे सुरू करून १००% नागरिकांना लसीकरण करण्यात यावे अशी मागणी सरपंच निकीता सणस तसेच ग्रामपंचायत भुगांव मार्फत करण्यात आली आहे.

         सदरची मागणी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख, गटविकास अधिकार संदिप जठार ,वैद्यकीय अधिकारी अजित कारंजकर यांच्याकडे सुध्दा करण्यात आली आहे.यावेळी उपसरपंच सुरेखा शेडगे,जीवन कांबळे,रमेश सणस,जितेंद्र इंगवले, नितीन शेडगे,विशाल सुर्वे,मयुर सणस उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top