logo
add image
add image
Blog single photo

पौड जवळील सुर्वेवाडी येथे रानगव्याचे दर्शन


पौड : पौड जवळील सुर्वेवाडी फाटा येथे नागरिकांना रानगव्याचे दर्शन झाले असून सैरभैर फिरत असलेल्या रानगव्याला वनविभाग, एनिमल रेस्क्यू टिम तसेच आपत्ती व्यवस्थापन टिमच्या सदस्यांनी सुर्वेवाडी जंगलाच्या बाजूने नेऊन सोडून दिले.

       मिळालेल्या माहितीनुसार गेली दोन दिवस हा रानगवा सुर्वेवाडीच्या बाजूला फिरताना नागरिकांना दिसत होता. आज सकाळी हा रानगवा सुर्वेवाडी येथील काळा बंगल्याच्या बाजूला आला. या परिसरात नागरी वस्ती असल्याने येथील नागरिकांनी संबंधित घटना तहसिलदार अभय चव्हाण आणि पोलिस अशोक धुमाळ यांना कळविली. यानंतर एनिमल रेस्क्यू टिम आणि वनविभागाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी या रानगव्याला सुर्वेवाडीच्या जंगलाच्या बाजूने नेऊन सोडून दिले.

       यावेळी वनपरिक्षेञ अधिकारी पी.व्ही.कापसे, पौड वनपाल एम एस हिरेमठ, वनरक्षक पी व्ही कासूळे, आर.डी.मराडे, एस.बी.दराडे, काजल पाटील,आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे,तंटामुक्ती अध्यक्ष आकाश सणस, संतोष भिलारे, सागर चव्हाण यांनी या रानगव्याला जंगलाच्या बाजूने नेऊन सोडून दिले.

add image
add image

Leave Comments

Top