बावधन : पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलच्या बावधन शाखेतील इयत्ता ५ तील विद्यार्थी लक्ष्मीकांत पांचाळ याने स्वहस्ते अमिताभ बच्चनचे यांचे हुबेहुब स्केच काढून ट्विटर वर पाठवले असता त्याला अमिताभजींनी स्वतः ते स्केट्च बघून ट्विटर वर लाइक करून पाठवले आहे. लक्ष्मीकांत हा केवळ ११ वर्षाचा विद्यार्थी येवढे हुबेहूब स्केच बनवतो याचा खरच पेरिविंकल स्कूलसाठी गौरवाची बाब आहे. त्याचा हा गुण वाखाणुन रिपोर्ट डे ला या विद्यार्थ्याला एक्सेप्शनल अचीव्मेंट चे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होतेच. परंतु आता अमिताभजींच्या ट्विटरच्या लाइक मुळे दुधात साखर मिसल्याचा मान पटकावला.
अभ्यासक्रमाला दुजोरा देत इतर सुप्त कलागुणाना देखील वाव देण्यासाठी पेरिविंकल शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल तसेच संचालिका सौ रेखा बांदल हे कायमच तत्पर आसतात.लक्ष्मीकांतची ही कला खरोखरच वाखाणया जोगी आहे. यात त्याचे पालक व कला शिक्षक नीता पवार यांचे खूप मोठे योगदान आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, विभागप्रमुख निर्मल पंडित व रुचिरा खानविलकर यांनी देखील त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.